Posts

जर्मीनेटर

जर्मीनेटर जर्मीनेटर तयार करण्याचे कारण ? आपण मका मोड येण्यासाठीचा वेळ कमी करणे याचे कारण आहे . मकेला मोड येण्यासाठी पावसाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये तापमानाचे प्रमाण कमी असते त्यामुळे मोड येण्यासाठी आपण गोनपाटात दडपून रूम टेंम्परेचेरला ठेवतो.यामुळे मोड यायला  48 तास किंवा त्यापेक्षा जास्त तास लागत होते. त्या माकेला चिकटपणा येतो, त्यामुळे बुरशी त्यावर लवकर येते. जर्मीनेटर कसा आहे ? जर्मीनेटर हा पूर्णपणे स्वयंचलित आहे यामध्ये पाणी आणि तापमान याचे सेंसर बसवलेले आहेत. यामुळे ८०%पेक्षा कमी आद्रता झाली तर आपोआप पाणी फवारले जाते आणि तापमान 28 % पेक्षा कमी तापमान झाले कि हिटिंग चालू होते. हा जर्मीनेटर हवाबंद आहे.     जर्मिनेटरचे कार्य  जर्मीनेटर हा माकेला लवकर कोंब येण्यासाठी मदत करते. आद्रतेचे प्रमाण आणि उष्णतेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे लवकर कोंब येतात .यामध्ये गहू,ज्वारी,मका,बाजरी,यांचा उपयोग करता येतो.  जर्मीनेटर हा स्वस्त दरामध्ये उपलब्ध होऊ शकतो. 

aquaponic

                                                             aquaponic     aqua म्हणजे पाणी ponic म्हणजे शेती म्हणजेच पाण्यावरची शेती यामध्ये असे केले जाते कि दोन लहान शेततळे असतात. एका तळ्यामध्ये मासे पाळायचे आणि दुसर्या तळ्यामध्ये पाणी ठेवायचे. तळ्याच्या वरच्या बाजूला खडक,वाळू,विटा,यापासून तयार करायचे म्हणजे त्यामध्ये पाणी सोडले तर ते पाणी खालच्या बाजूला यावे. माश्यांच्या तळ्यामध्ये असलेले पाणी हे त्यावरती तयार केलेल्या बेडवर दोन दिवसांनी सोडून द्यायचे. पाणी फिरवण्याची पद्धत मोठ्या तळ्यामधून पाणी लहान तळ्यामध्ये सोडले जाते. लहान तळ्यातून पाणी बेडवर सोडले जाते असे दोन दिवस चालू असते. तिसऱ्या दिवशी पाणी बदलले जाते . पाणी बदलले का जाते ? मास्यांच्या विष्ठेमध्ये नत्राचे प्रमाण असते.त्यामुळे पाण्यामध्ये नत्राचे प्रमाण वाढले कि ऑक्सिजन चे प्रमाण कमी होते. म्हणून पाणी बदलेले जाते. हे पाणी बेडवरची अळू शोषून घेते आणि त्यावरती वाढते . पाणी परत तळ्यामध्ये जाते . त्यामध्ये हवेतील ऑक्सिजन मिसळला जातो. अश्या प्रकारे पाण्यावर शेती आणि मत्स्य पालन केले जाते.

कलम करणे

Image
कलम करणे आंब्यावर पाचर कलम करताना  डाळिंबावर गुटी कलम करत असताना आम्ही 

माती परीक्षण

                                                     माती परीक्षण  माती परीक्षण का करतात ? शेतीतून जादा  उत्पन्न घेण्यासाठी  रासायनिक खतांचा वापर  मोठ्या प्रमाणात होऊ लागला  आहे. मात्र यामुळे शेतीच  आरोग्य धोक्यात येऊ लागलं  आहे. शेतीच हे आरोग्य टिकवून  ठेवण्यासाठी वेळच्यावेळी  आपल्या शेतीतल्या मातीच आणि  पाण्याचं परीक्षण करणं  हिताच ठरतं. जमिनीत काही  विशेष दोष आढळून आल्यास  त्यावर योग्य उपाय शोधणं,  पिकांना दिली जाणारी खते  प्रमाणशीर न दिल्याने  पिकांची जोमदारपणे वाढ होत  नाही. तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त  खते दिल्याने अनावश्यक खर्च  वाढतो. मातीपरीक्षण  केल्यामुळे आपल्या शेतीची  अन्नद्रव्याची नेमकी गरज  शेतकऱ्याला लक्षात येऊ  शकते.त्यामुळे खतांच्या  वापरात आणि खर्चात बचत होऊन  पिकांचे उत्पादनही वाढू  शकते. माती परीक्षण हे आपल्या जमिनीमध्ये कोण कोणते घटक आहेत ते पाहण्यासाठी माती परीक्षण केले जाते . माती परीक्षणासाठी मातीचा  नमुना कोणत्या ठिकाणचा घेऊ नये . बांधाच्या कडेचा. शेतामध्ये टाकलेल्या खताच्या ढिगाऱ्या खालची घेऊ नये . जमिनीची माश्यागत करण्याच्या नंतर घेऊ नये . एकच

गाई चे अंदाजे वजन काढणे .

माघील आठवड्यात मी गाई चे अंदाजे वजन करायला शिकलो ,सचिन सरानी मला शिकवला ,मीटर  टेेप च्या मदतीने  गाई   ची छाती मोजून घ्यायची त्या नंतर गाई चे माकड हाड(Monkey Bone) मोजावे सेमी.मध्ये माकड हाडा चे मोज माप =अ छाती चे मोजमाप=ब त्या नंतर खालील सूत्रात किमती टाकून घेतल्या (अ *अ * ब )/(१०४००)    आमच्या कडे असणाऱ्या गाई चे वजन मी असे काढले अ=150 ब=152   (१५०*१५०*१५२)/१०४०० =३२८ एवढे वजन आले  

मुरघास

Image
                                                              मुरघास  मुरघास हा जनावरांचे खाद्य आहे. यामध्ये असे केले जाते की हिरवा चारा हा अम्बवण्यात येतो आणि यामुळे तो चारा जास्त काळ टिकवण्यात येतो. चाराटंचाईमध्ये याचा फायदा होतो. मुरघास कोणत्या पिकापासून तयार करता येतो ? मुरघास हा द्विदल आणि एकदल चाऱ्यापासून करता येतो.   यामध्ये एकदालात ज्वारी मका अश्या चारा पिकाचा उपयोग होतो. मुरघास तयार करताना लागणारे घटक . मिनिरल मिक्स्चर , गुळ , युरिया इत्यादी. युरियाचा वापर १% करायचा. मुरघास  कसा तयार करतात ? मुरघास तयार करताना प्रथमता चाऱ्याची कुट्टी करून घेतली. चाऱ्याला पसरवून घेतले आणि त्यामधले पाण्याचे प्रमाण थोड्या प्रमाणामध्ये कमी करून घेतले. मुरघासाच्या बागेमध्ये एका फुटाचा थर घेऊन त्यावर मिश्रणाचा शिम्पड केला. आणि त्याला नाचून दाबून त्यामधली हवा काढून घेतली. अश्याप्रकारे ५०० किलोची पिशवी पूर्णपणे भरून घेतली . पिशवीला हवाबंद करून ठेवली. ६० दिवसांनी मुरघास तयार होतो. तयार झालेल्या मुरघासाला मधुर सुवास येतो. तयार झालेला मुरघास असा दिसतो.